तुरुंगात कमावलेल्या पैशांचे काय केले, संजय दत्तने दिले उत्तर

    दिनांक :05-Dec-2019
|
मुंबई,
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपला आगामी चित्रपट पानिपतचे प्रमोशन करत करण्याकरिता 'कपिल शर्मा शो'मध्ये गेला होता. यावेळी त्याने स्ट्रगल, तुरुंगातील दिवस यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. नुकताच या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात संजय तुरुंगात कमावलेल्या पैशांचे काय केले, याबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसतो आहे.

sanjay datt_1
 
शोमध्ये कपिलने संजयला प्रश्न विचारला की, तुरुंगात रेडिओवर प्रोग्राम सुरू केला आणि फर्नीचरही तयार केले. एवढे नाही तर कागदाचे लिफाफेही तू तयार करायचा. या सर्व गोष्टी तू किती वेळात शिकलास? या प्रश्नाचे उत्तर देताना संजय म्हणाला की, 'या सर्व गोष्टी शिकायला मला फार वेळ लागला. तुरुंगात प्रत्येकालाच काम करावे लागत होते. शिक्षा कमी करायची असेल तर तुरुंगात काम करावं लागतं. मला एक कागदी बॅग तयार करण्याचे १० पैसे मिळायचे. मी ते सारे पैसे जमवले कारण रक्षाबंधनाला मला ते माझ्या बहिणींना द्यायचे होते.' त्याचे हे वाक्य ऐकून उपस्थित भावुक झाले आणि त्यांनी संजयसाठी टाळ्या वाजवल्या.
 
शोमध्ये आपल्या स्ट्रगलबद्दल सांगताना संजयने प्रेक्षकांचे मनोरंजनही केले. यावेळी कपिलने त्याच्या ३०८ प्रेयसीबद्दलही प्रश्न विचारला. याचे संजयने फार मजेशीर उत्तर दिले. पानीपतची को-स्टार क्रिती सेननबद्दल बोलताना संजय म्हणाला की, त्याला क्रिती फार आवडली असून ती त्याची ३०९ वी गर्लफ्रेंड होऊ शकते. त्याचे हे उत्तर ऐकून सगळेच हसायला लागले.