'हा' अभिनेता फक्त एका जाहिरातीसाठी घेतो 11 कोटी

    दिनांक :06-Dec-2019
|
मुंबई,
आपण बॉलिवूड कलाकरांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या जाहिराती नेहमीच पाहतो. एखादी अभिनेत्री फेअरनेस क्रीमचे प्रमोशन करताना दिसते तर अभिनेता एखाद्या कोल्ड ड्रीकचे प्रमोशन करताना दिसतो. आपण मात्र जाहिरात पाहतो आणि सोडून देतो. परंतु, तुम्हाला माहित आहे, का एका जाहिरातीसाठी किती मानधन घेतात. जर ब्रँड एंडोर्समेंटमधून होणाऱ्या कमाईची यादी बनवली तर यात अभिनेता आमिर खान सर्वात वरच्या स्थानावर असेल.
 

aamir khan_1  H 
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान एका उत्पादनाचे प्रमोशन करण्यासाठी 11 कोटी रुपयांचे मानधन घेतो. तर शाहरुख खान एका जाहिरातीसाठी 9 कोटी एवढी रक्कम घेतो. या रेट लिस्टमध्ये बिग बी अमिताभ बच्चन तिसऱ्या क्रमांकावर असून ते एका जाहिरातीसाठी 8 केटी रुपयांचे मानदन घेतात. दैनिक भास्करने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अक्षय कुमार-7 कोटी, सलमान खान-7 कोटी, विक्की कौशल-3 कोटी, टायगर श्रॉफ-2.5 कोटी, राजकुमार राव-1.5 कोटी एवढे मानधन घेतात. जाहिरात क्षेत्रात सध्या समोर येत असलेल्या नव्या चेहऱ्यांमध्ये विकी कौशल सर्वात टॉपला आहे.