अभिनेत्री नेहा जोशी दिसणार चरित्र भूमिकेत

    दिनांक :06-Dec-2019
|
 
 
joshi_1  H x W:
 
नायिका किंवा खलनायिकेच्या भूमिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री नेहा जोशी एका वेगळ्या भूमिकेत लवकरच दिसणार आहे. एका आगामी हिंदी मालिकेत ती ही चरित्र भूमिका साकारतेय. ही मालिका म्हणजे, 'एक महानायक : डॉ. बी. आर. आंबेडकर'. या मालिकेत नेहा, भीमाबाई रामजी सकपाळ म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईची भूमिका साकारणार आहे. या निमित्तानं नेहा चरित्र भूमिकेत पाहायला मिळेल.