क्रांती रेडकर करणार कमबॅक!

    दिनांक :06-Dec-2019
|
 
kranti redkar_1 &nbs
 
लग्नानंतर मधल्या काळात संसारात रमलेली अभिनेत्री क्रांती रेडकर मनोरंजन विश्वापासून काहीशी लांब झाली होती. बऱ्याच दिवसांनंतर ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. गप्पा-गोष्टी आणि संगीताचा समावेश असलेल्या अनोख्या 'मैफिल' या टीव्ही रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन ती करणार आहे. क्रांतीने आजवर अनेक पुरस्कार सोहळ्यांसाठी सूत्रसंचालन केले आहे. परंतु, छोट्या पडद्यावर ती पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसेल. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.