संगणकापासून डोळे वाचवा

    दिनांक :06-Dec-2019
|
आजघडीला संगणक आपल्या आधुनिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. आज ‘संगणक’ ही मानवजातीस मिळालेली खूप मोठी देण आहे. संगणक आधारित एकही काम केले नाही, असा माणूस आज शोधून सापडणार नाही. मग ते नागरिकत्वाचे दाखले असो िंकवा दैनंदिन व्यापार; सर्व संगणक आधारितच. तात्पर्य - या आधुनिक युगाचे चाक म्हणजे संगणक!
 
 
com_1  H x W: 0
 
असे असताना ‘संगणकापासून डोळे वाचवा’ हे वाचल्यावर आपल्या भुवया उंचावल्या असतीलच. वाचकहो, संगणकाच्या वापराने डोळ्यांना त्रास होत असल्याची वेदना घेऊन रोज माझ्याकडे पाच-दहा तरी रोगी येत असतात. होणारा त्रास त्यांना जाणवतो, पण तो का होत असेल याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. रोगी सांगतात - ‘‘काही काळ संगणकावर काम केल्यानंतर डोळ्यांची जळजळ व्हायला लागते, डोळे दुखायला लागतात. डोक्यावर ताण पडून कधी कधी डोकेही दुखते. साधा सूर्यप्रकाशही सहन होत नाही. सूर्यप्रकाशात गेलं तर अश्रूस्राव व्हायला लागतो. सायंकाळपर्यंत डोळे लाल होतात. आणि कधी कधी सकाळी उठल्यानंतर पापण्या चिपकलेल्या असतात.’’ अशा कितीतरी वेदना घेऊन रोगी येतात.
 
 
वाचकहो, संगणकामुळे डोळ्यांना होणार्‍या या त्रासाला ‘संगणकजनित नेत्रशुष्कता’ असे म्हणतात. वास्तविक पाहता- संगणकाच्या पडद्यामधून अतिनील किरण निघत असतात; जे डोळ्यांतील आदर्‌रता शोषून घेतात. आदर्‌रता कमी झाली, की- डोळ्यांची सामान्य क्रिया जशी - पापण्यांची उघडझाप, स्पष्ट पाहणे, बुबुळांची हालचाल इत्यादी बाधित होते. आणि, वर नमूद केल्याप्रमाणे त्रास सुरू होतो. मग यावर उपाय काय? संगणक वापरणेच सोडून द्यायचे का? मी असं म्हटलं तर कुणीही मला वेड्यात काढणार, होय ना?
 
 
वाचकहो, आपण आधुनिक युगात वावरतो. मग तंत्रज्ञानाचा वापर हा आलाच. पण खरी गोम ही आहे, की- आपण तंत्रज्ञान वापरायला तर लागलो; पण ते ‘सुरक्षितपणे कसं वापरावं’ याकडे मात्र दुर्लक्ष झालं. संगणकाचा वापर कसा करावा; जेणेकरून डोळ्यांना त्रास होणार नाही; यावर थोडा प्रकाश टाकतो -
 
संगणकाच्या पडद्यामधून येणार्‍या अतिनील किरणांना मज्जाव घालण्यासाठी परावर्तनरोधक पडदे वापरायला हवेत तसेच डोळ्यांवरही तशाप्रकारचे चष्मे वापरावेत.
 
पडद्याच्या प्रकाशाची तीव्रता कमी ठेवावी.
 
पडदा थोडा तिरपा ठेवावा; जेणेकरून अतिनील किरण थेट चेहर्‍यावर िंकवा डोळ्यांवर पडणार नाहीत. 
 
ज्या कक्षात आपण संगणक वापरतो, त्या कक्षात भरपूर सूर्यप्रकाश असावा. निदान भरपूर उजेड तरी असावा. (अंधारात संगणकाचा वापर करू नये.)
 
संगणकापासून चेहर्‍याचे अंतर दोन फूटापेक्षा अधिक असावे; जेणेकरून संगणकाची िंकवा पडद्याची उष्मा डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही. (या उष्म्यामुळे डोळ्यांतील अश्रूंचे बाष्पीभवन होत असते.)
 
बसण्याचे आसन सुखकारक असावे. पाठीला आधार मिळेल असेल तसेच मान जास्त वाकणार नाही असे. अन्यथा मान व पाठ दुखू शकते.
 
संगणकाचा वापर करताना डोळ्यांची निरंतर उघडझाप करावी. याने अश्रूंचा थर सामान्य राखण्यास मदत होते.
 
दर 45 मिनिटांनी कमीतकमी 5 मिनिटांची आणि दर दीड तासाने 10 मिनिटांची विश्रांती घ्यावी.
 
दिवसातून तीन ते चार वेळा डोळ्यांवर थंड पाण्याचा शिडकावा करावा. याने संगणकाच्या उष्म्यामुळे वाढलेले डोळ्यांतील तापमान सामान्य होण्यास मदत होते.
 
तळहातांचे घर्षण करून डोेळ्यांवर ठेवावे, थोडे चोळावे. याने डोळ्यांचे स्वेदन-मर्दन होऊन डोळ्यांना आराम मिळतो.
 
संगणकामुळे डोळ्यांवर होणार्‍या उपरोक्त दुष्परिणामावर बाजारात काही नेत्रिंबदू मिळतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचा वापर करू शकता. पण हे नेत्रिंबदू पाहिजे तेवढे परिणामकारक नाहीत. कारण अश्रूंसमवेत ते काही वेळाने वाहून जातात. पुन्हा त्रास जसाच्या तसा.
 
‘संगणकजनित नेत्रशुष्कता’वर आयुर्वेदात फार चांगले उपाय आहेत. या आजारावर वापरण्यात येणारी औषधे ही गाईच्या तूपापासून बनविण्यात येत असल्याने ती तैलीय असतात. जी डोळ्यांचे चांगले स्नेहन करतात व अश्रूंचे बाष्पीभवन थांबवितात. बरं, ते नेत्रिंबदूसारखे निरंतर वापरावे लागत नाही. दर दोन दिवसाआड केवळ 8 मिनिटांची ‘तर्पण चिकित्सा’ केली तरी पुरे. या तर्पण चिकित्सेचा प्रभाव फार दीर्घकाळ असतो. संगणकच काय तर तत्सम संसाधने जसे - भ्रमणध्वनी, दूरदर्शन, चित्रपट यांपासून डांळ्यांना होणारा धोकाही टाळता येतो हे सांगणे न लगे.
शेवटी एकच सांगणे - संगणक वापरा; पण जरा जपून!
 
•डॉ. यादव गावळेे
911750750