‘तुम बिन’ची अभिनेत्री सांभाळतेय कोट्यवधींचा व्यवसाय

    दिनांक :07-Dec-2019
|
पहिल्या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या काही अभिनेत्री नंतर मात्र इंडस्ट्रीत फार दिसत नाहीत. अशाच अभिनेत्रींपैकी एक असलेली संदली सिन्हाने ‘तुम बिन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आपले सौंदर्य, निखळ हास्य, बोलके डोळे आणि अभिनयाने संदली सिन्हाने केवळ लोकांच्या मनावर राज्यच केले असे नाही तर या चित्रपटामुळे रातोरात तिचे नशीबही चमकले.
 

sandali sinha _1 &nb 
निर्माते, दिग्दर्शक अगदी डोळे बंद करून चित्रपटात घेऊ शकतात, अशी अभिनेत्री चित्रपटसृष्टीला मिळाली होती. पण, पहिल्या चित्रपटाने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेली संदली नंतर रुपेरी पडद्यापासून गायब झाली. ‘तुम बिन’नंतर तिला काही चित्रपट मिळाले. मात्र, त्यात ती काही फारशी कमाल दाखवू शकली नाही. अखेर बॉलिवूडमध्ये आपला जम बसविण्यात अयशस्वी ठरल्यानंतर तिने २००५ साली व्यावसायिक किरण सालस्कर याच्याशी विवाह केला.
लग्नानंतर संदली जवळपास सात – आठ वर्षं रुपेरी पडद्यापासून दूर राहिली आणि त्यानंतर तिने पुनर्पदार्पण केले. दाक्षिणात्य चित्रपटांमधून ती प्रेक्षकांसमोर आली. पण, तेथेही तिला हवेतसे यश मिळाले नाही. आता संदली चित्रपटांव्यतिरीक्त व्यवसायावर लक्ष केंद्रित करतेय. देशातील सर्वात मोठी बेकरी असलेल्या ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ची ती मालक आहे. संदली आणि तिचा पती किरण सालस्कर यांनी या बेकरीचा पाया रचला. त्यांना दोन मुलेही आहेत.