अभिनेत्री पूनम पांडेला बलात्काराची धमकी

    दिनांक :07-Dec-2019
|
मुंबई,
हैदराबाद आणि उन्नावमधील घटनांनी देश हादरला असतानाच, बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेला बलात्कार आणि ॲसिड हल्ल्याच्या धमकीचे फोन येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पूनमने स्वत: टि्‌वट करून आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या टि्‌वटमध्ये तिने मुंबई पोलिस, मुख्यमंत्री कार्यालय आणि गुगललाही टॅग करून मदत मागितली आहे.
 

poonam pandey _1 &nb 
 
देशातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त होत असतानाच, अभिनेत्री पूनम पांडेने मला बलात्कार आणि ॲसिड हल्ल्याच्या धमक्या येत असल्याचे म्हटले आहे. यासंबंधी तिने टि्‌वट केले आहे. त्यात मुंबई पोलिस, गुगल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टॅग केले आहे. माझा मोबाईल क्रमांक एका ॲपवरून शेअर करण्यात आला आहे. याबाबत मी गुगलकडे वारंवार तक्रार केली, पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मला बलात्कार आणि ॲसिड हल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. 24 तास मी दहशतीखाली असते. कृपया मला मदत करा, असे तिने टि्‌वटमध्ये म्हटले आहे. तुमचा संपर्क क्रमांक पाठवू शकता का, असे विचारत आम्ही या संदर्भात दखल घेतली आहे, असे टि्‌वट मुंबई पोलिसांनी केले आहे.