हनी सिंगच्या गाण्यावर नेहा कक्करचा डान्स

    दिनांक :07-Dec-2019
|
नवी दिल्ली,
सिंगर नेहा कक्कर गाण्यांसोबतच तिचा डान्स आणि कॉमेडीसाठीही प्रसिद्ध आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात ती यो यो हनी सिंगच्या गाण्यावर धम्माल करत आहे. नेहा कक्करचा डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहत्यांनीही मोठी गर्दी केली. नेहा कक्कर तिच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण तिचा डान्सही चाहत्यांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. एका चाहत्याने नेहा कक्करचा डान्स इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
 

neha kakkar_1   
ती स्वतः व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच ती कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्येही दिसली होती. या शोमध्ये तिची बहीण सोनू कक्कर आणि भाऊ टोनी कक्करचाही समावेश होता.