अभिनेत्री नेहा महाजन उत्कृष्ट 'सतार' वादक

    दिनांक :08-Dec-2019
|
अभिनेत्री नेहा महाजनने मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी आणि बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे. मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असते. नेहा एक उत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच एक उत्कृष्ट सतार वादकही आहे. 

 


neha mahajan_1   
 
नेहाला अभिनयासोबतच सतार वादनाचीदेखील आवड असून हे खूप कमी लोकांना माहिती आहे. नेहाचे वडील पंडित विदुर महाजन हे प्रसिद्ध सतार वादक आहेत. वडिलांना सतार वाजवताना पाहून नेहा देखील या वाद्याच्या प्रेमात पडली. वडिलांसोबत नेहा कार्यक्रमात सहभाग घेते. काही दिवसांपूर्वी नेहा बँकॉकमध्ये बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडासोबत शूटिंग करत होती. तिने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना दिली होती. नेहाने एक फोटो शेअर केला होता. या फोटोतून तिने चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं आहे.