नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचे निधन

    दिनांक :08-Dec-2019
|

sama_1  H x W:  
 
मुंबई,
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आघाडीचे स्थान प्राप्त करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची बहिणी सामा तामसीचे शुक्रवारी कर्करोगाने निधन झाले. ती गेल्या आठ वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र, शुक्रवारी पुण्यात तिने अखेरचा श्वास घेतला. सध्या नवाज त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणामुळे अमेरिकेत आहे.
 
 
 
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नवाजने बहिणीसोबतचा एक फोटो समाज माध्यमावर शेअर केला होता. त्याने 13 ऑक्टोबरला टि्‌वटरवरून बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यात लिहिले की, वयाच्या 18 व्या वर्षी तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे आम्हाला कळले. पण इच्छाशक्ती आणि धैर्यामुळे कितीही संकटे आली, तर ती खंबीरपणे उभी राहिली. आज ती 25 वर्षांची झाली आणि ती अजूनही लढत आहे. मी डॉक्टर आनंद कोपीकर आणि डॉ. लालेश बुश्री यांचे आभार मानतो. त्यांनी सतत तिची मदत केली. यासोबतच मी रसूल पूकुट्‌टीचेही आभार मानतो, ज्यांनी मला या दोघांना भेटवले. नवाजच्या बहिणीवर उत्तरप्रदेशमधील बुधाना गावी अंत्यसंस्कार केले जातील.