मराठीतही प्रदर्शित होणार ‘तान्हाजी’

    दिनांक :08-Dec-2019
|
मुंबई,
‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला. अजय देवगणची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट हिंदीसोबत आता मराठीतही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
 

tanhaji_1  H x  
 
‘हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का!’ असे दमदार संवाद आणि ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग आमच्या रायबाचे,’ असे म्हणणार्‍या एकनिष्ठ तानाजींची शौर्यगाथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आता मराठीमध्येही पाहायला मिळणार आहे. याबाबत बोलताना अजय देवगण म्हणतो, तानाजी मालुसरेंसारख्या शूरवीराची कथा हिंदीसोबतच त्यांच्या मातृभाषेत अर्थात्‌ मराठीमध्ये प्रेक्षकांसमोर मला आणता येणार आहे, हे मी माझे भाग्य समजतो. आमच्या या प्रवासात भारतातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राचाही पुढाकार असावा, असे मला अगदी मनापासून वाटते.
 
‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत म्हणाले की, तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा मला जगभरात पोहोचवायची होती. त्यामुळे मी सुरुवातीला केवळ हिंदीत चित्रपट करायचा अशी कल्पना डोक्यात ठेवून अजय देवगण यांना भेटलो, पण हा चित्रपट मराठीमध्येदेखील प्रदर्शित व्हायला पाहिजे, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात ही शौर्यगाथा पोहोचवायची असल्यास ती मराठीमध्ये सादर करणे महत्त्वाचे आहे, याविषयी ते ठाम होते. त्यामुळे आता हा चित्रपट 10 जानेवारी 2020 ला एकाच दिवशी िंहदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, असे ओम राऊत यांनी सांगितले.