२ हेक्टर जमीनधारक शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
 
दुष्काळ व नापिकीच्या समस्येला तोंड देणाऱ्या देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असून एकूण १२ कोटी शेतकऱ्याना याचा लाभ होणार आहे.
 
 
 
 
 

 
 
 
गेल्या साडेचार वर्षांत सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्येही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, आता वर्षाला थेट सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील. दोन-दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातील. या योजनेपोटी सरकारी तिजोरीवर एकूण ७५ हजार कोटींचा भार पडणार आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू होणार असून लवकरच पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.