लठ्ठपणा - कारणे व उपाय
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
अनेक रोगांचे मूळ कारण असलेला लठ्ठपणा कां व कसा येतो हे थोडक्यात जाणून घेऊ. लठ्ठपणा
येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे खाण्याच्या अयोग्य सवयी आणि व्यायामाचा अभाव. खाण्याच्या अयोग्य
सवयी जशा की - तळलेले पदार्थ खाणे, मैद्याचे पदार्थ जास्त खाणे, चिप्स, चॉकलेट, केक, पेस्ट्री, मांसाहारी
पदार्थ जास्त घेणे, फास्ट फूड जसे पिझ्झा, बर्गर, ज्युस, कोला, सॉफ्ट िंड्रक, डबाबंद पदार्थ खूप घेणे,
खाण्याच्या अनियमित वेळा.
 
खाण्याच्या सवयी लहानपणापासून योग्य लावायला हव्या. कारण आजकाल लहान मुलांमध्ये देखील
लठ्ठपणा वाढत चालला आहे. त्यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब हे आजारदेखील लहान मुलांमध्ये दिसू लागले
आहेत. खाण्याच्या वेळा नियमित पाळल्यास बर्‍याच अंशी लठ्ठपणा टाळता येऊ शकतो. सकाळी 8-9 च्या
दरम्यान ब्रेकफास्ट आणि रात्री 8-9 च्या दरम्यान जेवण हे अत्यंत कटाक्षाने पाळायला हवे. रोजच्या जेवणात
कच्च्या पालेभाज्या, मुळा, काकडी, टमाटर, गाजर, बीट, कांदा, लसूण यांचा समावेश व्हायला हवा. रोज
फळं, दूध, ताक, सुकामेवा हे देखील योग्य प्रमाणात घ्यायला हवे. चरबीयुक्त पदार्थांपेक्षा तंतूमय व प्रथिनेयुक्त
पदार्थ जास्त प्रमाणात घ्यायला हवे. आपल्या शरीरात कर्बोदके, प्रथिने, चरबी, तंतू, जीवनसत्वे, खजिने
आणि पाणी या सगळ्यांचीच गरज असते पण त्यांचे योग्य प्रमाणात शरीरात जाणे महत्वाचे असते. अति कमी
िंकवा अति जास्त प्रमाण शरीराला नुकसान करू शकते.
 

 
 
व्यायाम िंकवा शरीराची हालचाल ही शरीरासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अन्नातून जी ऊर्जा
आपल्या शरीरात साठलेली असते त्या ऊर्जेचा योग्य उपयोग झाल्यास शरीर सुदृढ राहते. अन्यथा लठ्ठपणा व
इतर अनेक रोग होण्यास सुरुवात होते. शरीरामध्ये होणार्‍या निरनिराळ्या रासायनिक प्रक्रिया सर्व अवयवांचे
कार्य, हृदय, फुफ्फुसे, मेंदू यांचे कार्य या सगळ्या गोष्टींसाठी या ऊर्जेचा उपयोग होतो. पण शरीराच्या
गरजेपेक्षा जास्त कॅलरीज जर घेतल्या गेल्या तर त्या जास्तीच्या कॅलरीज चरबीच्या रूपात शरीरात साठलेल्या
राहतात. ह्या कॅलरीजची गरज वयानुसार, रोजच्या कामानुसार, हालचालींनुसार, स्त्री-पुरूष यांच्यानुसार
वेगवेगळी असते. जेव्हा आपल्याला लठ्ठपणा कमी करायचा असतो तेव्हा ह्या कॅलरीज आपल्याला अन्नातून
कमी प्रमाणात घ्याव्या लागतात. तसेच त्या व्यायामातून जास्तीत जास्त जाळाव्या लागतात. वजन कमी
करण्यासाठी जड व्यायाम करणे अत्यंत गरजेचे असते, ज्याने जास्त कॅलरीज जळतात. जसे -
व्यायाम प्रकार जळणार्‍या कॅलरीज
जलद चालणे (5 किमी/तास) 180 कॅलरीज
बागकाम (1 तास) 200 कॅलरीज
सायकल चालवणे (15 किमी/तास) 360 कॅलरीज
धावणे (8 ते 10 किमी/तास) 520 कॅलरीज
नाचणे 370 कॅलरीज
अंगाला वाक देणारे व्यायाम प्रकार जसे सूर्यनमस्कार, योगासने देखील आवश्यक असतात. हृदयरोग,
मधुमेह, उच्चरक्तदाब असणार्‍यांनी तज्ञांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करायला हवा.