मिताली राजने रचला "हा" रेकॉर्ड
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
नवी दिल्ली : 
 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही एकूण २०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. आज न्युझीलंडविरुद्ध झालेल्या तिसरा एकदिवसीय सामना खेळून तिने हा टप्पा पूर्ण केला.
 

 
 
३६ वर्षीय मितालीने २५ जून १९९९ रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्यावेळी तिने नाबाद ११४ धावा केल्या होत्या तर भारत १६१ धावांनी जिंकला होता. तिने संपूर्ण कारकिर्दीत सर्वात जास्त म्हणजेच ६६२२ धावा केल्या आहेत.