भरीताच्या वांग्यावर अळीचा प्रादुर्भाव
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
- वायगावतील शेतकरी त्रस्त

- कृषिविभागाचे दुर्लक्ष

वर्धा :
जिल्हातील शेतकरी बोड अळीने मागील २ वर्षांपासून त्रस्त आहेत. शेतीतील कापसाचे पीक हाती न लागत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून भरताची वांगी लावली होती. परंतु त्या वांगीवर देखील अळीने चांगलास तांडव केला आहे. जून महिन्यात वांगी लावली. वांग्याच्या झाडावर फुलं येत दिसताच या शेतकऱ्यांने ४ वेळा फवारणी केली. परंतु जेव्हा वांगी लागली तेव्हा प्रत्येक वांगी किडकस पाहायला मिळाली .आजही तिच परीस्थिती या वांग्यावर आहे.
 
 
 
वर्धेतील कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष देत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पिकांबद्दल कोणताही सल्ला आम्हाला करीत नाही. त्यामुळे आमचं जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टी पासून वंचित झालो आहे. असे आरोप वायगांवातील शेतकरी राजू राठी त्यांनी केले आहेत.