असंघटित कामगारांना दरमहा 3 हजार पेन्शन मिळणार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
नवी दिल्ली
मोदी सरकारने कामगारांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. 100 रुपये प्रतिमहिन्याच्या गुंतवणुकीवर 60 वर्षांच्या वयानंतर प्रतिमहिना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. 18व्या वर्षांपासून गुंतवणुकीला सुरुवात केल्यास दरमहा 55 रुपयेच गुंतवावे लागणार आहेत. मोदी सरकारच्या या योजनेचा वयोवृद्ध पेन्शनधारकांना मोठा फायदा मिळणार आहे. असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारनं ही मोठी घोषणा केली आहे, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे, तर 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार असल्याचेही गोयल म्हणाले आहेत.
 

 
 
 
लोकसभेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना गोयल यांनी कामगारांसाठीची ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविण्याची घोषणा केली आहे. आता जास्तीत जास्त २० लाख रुपयांची ग्रॅच्युईटी दिली जाणार आहे.
 
 
ही ग्रॅच्युईटी ही करमुक्तच राहणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.सध्या ग्रॅच्युईटीसाठीची अधिकतम मर्यादा १० लाख रुपयांची आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भविष्य निर्वाह निधी योजनेमधील खात्यांची २ कोटींनी वाढ झाल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ देशाामध्ये नोकऱ्या निर्माण होत असल्याने विरोधकांचा दावा खोटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.