#Budget2019: संरक्षणासाठी ३ लाख कोटींची तरतूद
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
 
 
 
 
अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकारने पहिल्यांदांच संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद वाढवून ३ लाख कोटी रूपयांची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या या हंगामी अर्थसंकल्पात सरकारने शेतकरी, गाय, रेल्वे आणि कररचनेशी निगडीत मोठ्या घोषणा केल्या आहेत.आमचे सैनिक आमचा अभिमान आहे. आम्ही ओआरओपीचे (वॅन रँक वन पेन्शन) वचन पूर्ण केले आहे. वन रँक वन पेन्शनसाठी आम्ही ३५ हजार कोटी रूपये दिले असे असेअर्थमंत्री पियुष गोयल म्हणाले.
आम्ही पहिल्यांदाच संरक्षण तरतूद वाढवून ३ लाख कोटी रूपये केली आहे. आमच्या सैनिकांसाठी आणखी निधीची गरज लागली तर सरकार त्यासाठी आणखी व्यवस्था करेन.