३ कोटी करदात्यांना होणार नव्या कर मर्यादेचा फायदा - पियुष गोयल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
नरेंद्र मोदी सरकारने आपल्या विद्यमान कारकिर्दीत  शेवटच्या आणि अंतरिम अर्थसंकल्पात आज देशभरातील सर्वसामान्य नागरिक, पगारदार वर्ग आणि शेतकऱ्यांसोबतच शस्त्र दलाच्या जवानांही मोठा दिलासा दिला आहे. पगारदार वर्गासाठी  आतापर्यंत असलेली २.५ लाख रुपये सवलत मर्यादा सरसकट दुपटीने वाढविताना ती ५ लाख रुपये केली आहे. याशिवाय अल्प भूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मदतही जाहीर केली आहे. याशिवाय आयकराच्या स्लॅब्समध्येही  महत्वपूर्ण बदल करून हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचाच निर्णय घेणारे असल्याचे दाखवून दिले आहे. अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत अर्थमंत्रालयाचा हंगामी पदभार सांभाळत असलेले पीयूष गोयल यांनी आज शुक्रवारी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना समाजातील सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
करदात्यांमध्ये ८० टक्क्यांची वाढ, कर भरण्यासाठी कार्यलयात जायची आव्यश्यकता नाही 
 
नवीन कंपन्यांना २५ टक्के कर भरावे लागणार
 
रेल्वेसाठी ६४ हजार ५०० कोटींची तरतूद
 
रेल्वेच्या विकासासाठी ६४ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा पियूष गोयल यांनी केली आहे. वंदे मातरम ही पहिली हायस्पीड ट्रेन देशात धावणार असेही गोयल यांनी म्हंटले.
 
येत्या ५ वर्षात डिजिटल गावांची निर्मिती होणार.
 
वन रँक पेन्शन द्वारे सरकारने गेल्या आर्थिक वर्षात जवानांना ३५ हजार कोटी रुपये दिले.
 
४० हजारापर्यंतच्या रकमेवर टीडीएस नाही
 
४० हजारापर्यंतच्या बँकेत ठेवलेल्या रकमेवर आता टीडीएस लागणार नाही अशी घोषणाही गोयल यांनी केली.
उज्वला योजने अंतर्गत ८ कोटी गॅस जोडणी
 
सिनेक्षेत्राच्या सगळ्या परवानग्या एकाच खिडकीवर
 
सिनेक्षेत्राशी संबंधित सगळ्या परवानग्या एकाच खिडकीवर मिळणार असं गोयल यांनी जाहीर केलं आहे. आपल्या भाषणात त्यांनी उरी सिनेमाचाही उल्लेख केला. पायरसी रोखण्यासाठी कठोर कायदा आणू अशीही घोषणा गोयल यांनी केली.
 
पोस्ट आणि बँकांमधील बचतीवरील ४० हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त होणार.
 
३ कोटी करदात्यांना होणार नव्या कर मर्यादेचा फायदा.
 
घर खरेदी करणाऱ्यांसाठी जीएसटी कमी करण्याचा विचार सुरु
 
जन-धन योजने अंतर्गत ३४ कोटी बँक खाती उघडली
 
किसान सम्मान निधी योजनेसाठी ७५ कोटी
 
२०१९ - २० ची आर्थिक तूट ३ टक्के राहील