सिंगल मदर एकता कपूरने केले बाळाचे नामकरण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
सरोगसीच्या माध्यमातून टेलिव्हिजन क्विन आणि आघाडीची दिग्दर्शिका अशी ओळख असेलली एकता कपूर पहिल्यांदाच आई झाली आहे. तिने सरोगसीतून २७ जानेवारीला मुलाला जन्म दिला आहे. सरोगसीच्या माध्यमातून एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर हा देखील सिंगल पॅरेंट बनला होता. आता एकताही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत सिंगल मदर बनली आहे.
 
 

 
 
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांनी दिली होती. जितेंद्र यांच्या नावावरूनच तिच्या बाळाचे नाव तिने ठेवले आहे. तिच्या बाळाचे रवी कपूर असे नाव ठेवले असून तिने यासोबतच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
 
 
 
जगातील सुंदर अनुभवांपैकी आई होणे हा एक आहे. आता माझ्या आयुष्यात हे ‘पालकत्त्व’ पर्व सुरू झाले आहे. बाळाच्या आगमनानंतर माझ्या सोबतच माझ्या कुटुंबामध्ये किती आनंदाचे वातावरण आहे, हे मी शब्दांत सांगू शकत नाही, अशा भावना एकता कपूरने सोशल मीडीया पोस्टमध्ये लिहून व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
अद्याप एकता कपूरने लग्न केलेले नाही. पण, तिला आई बनण्याची इच्छा असल्यामुळे तिने सरोगसीच्या माध्यमातून आई होण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, बाळाला सांभाळण्यासाठी तिने मानसीकरित्या पूर्व तयारी केल्यानंतरच आई होण्याचा निर्णय घेतला होता. बॉलिवूडमध्ये तुषार कपूर प्रमाणेच करण जोहर हा देखील सिंगल पॅरेंट आहे. त्यालाही सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळी मुले आहेत.