हेल्मेटसक्ती विरोधात घंटानाद आंदोलन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
बऱ्याच ठिकाणी हेल्मेटसक्ती झाले असून अनेकांनी या कायद्याचे समर्थन केले तर अनेकांनी विरोध. असाच काही विरोध सध्या पुणे शहरात पाहायला मिळत आहे. रद्द करा रद्द करा, पुणेकरांच्या मानगुटीवर बसणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, पुणेकरांच्या एकजुटीचा विजय असो , तुम्ही लावा कितीही शक्ती आम्हाला नको हेल्मेट सक्ती,  अशा घोषणा देत हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती पुणे यांनी मंडई टिळक पुतळा येथे घंटानाद आंदोलन केले. पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाल्यापासून पुणेकरांचे हाल होत आहेत. एखाद्या माणसाचे उत्पन्न दिवसाला तीनशे रुपये असेल तर तो पाचशे रुपये दंड भरत आहे. तसेच पुण्यातील रस्ते लहान असून वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. हेल्मेट सक्ती रद्द करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले.  
 
 
 
 
यावेळी माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरातवाला, नगरसेवक संदीप खर्डेकर, रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक शाम देशपांडे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, बाळासाहेब दाभेकर, शिवसेना कसबा विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे, काँग्रेस नेत्या डॉ सुनिता पवार, मंदार जोशी, अखिल ब्राम्हण महासंघ अध्यक्ष आनंद दवे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी उपस्थित होते.