उरी चित्रपट आणि ‘हाऊज द जोश’च्या घोषणा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
 
 
 
नवी दिल्ली,
 
 
देशभरात प्रचंड गाजत असलेला ‘उरी’ चित्रपटातील ‘हाऊज द जोश’ हा संवाद आज शुक्रवारी अर्थसंकल्पीय भाषणाच्या काळातही गुंजला. प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या शेतकरी, कामगार व मध्यमवर्गीयांच्या हितासाठी प्रत्येक घोषणेचे स्वागत करताना भाजपा खासदारांनी विरोधकांना टोले हाणले. ‘हाऊज द जोश’ हा ‘उरी’तील संवाद काही खासदारांनी विरोधकांकडे पाहून मारला.
 
 
 
 
 

 
 
गोयल यांच्या भाषणाला सुरुवात होताच, विरोधी बाकांवरील सदस्यांनी गोंधळ घातला. त्याचवेळी सत्ताधारी सदस्यांनी बाकं वाजवून अर्थमंत्र्यांना प्रोत्साहन दिले.
अर्थमंत्री सवलतींचा वर्षाव करीत असताना विरोधी बाकांवर शांतता होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच सत्तारूढ सदस्य बाकं वाजवत होते.