निवडणुकीवर या अर्थसंकल्पाचा परिणाम दिसून येईल - मनमोहन सिंग
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
 
 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकार ने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाला ' निवडणूक अर्थसंकल्प ' म्हणून वर्णन केले.  केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी सादर केलेले हंगामी अर्थसंकल्प निवडणुकांशी संबंधित असून मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर या अर्थसंकल्पाचा परिणाम दिसून येईल असे मनमोहन सिंग म्हणाले . 
 
 
निवडणूक वर्षातील मध्यमवर्ग, छोटे शेतकरी आणि ग्रामीण लोकसंख्येला सुखावणारा असा हा अर्थसंकल्प आहे. हे इलेक्शन बजेट आहे असे मनमोहन सिंग म्हणाले. 
 
शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना इन्कम टॅक्स गिफ्ट देण्याबाबत विचारले असता मनमोहन सिंग म्हणाले की, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना देण्यात आलेल्या सवलतीचा निवडणुकीशी संबंध आहे.