बंगळुरूमध्ये लढाऊ विमान कोसळले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 एचएएल विमानतळावर आज शुक्रवारी सकाळी मिराज २००० हे लढाऊ विमान कोसळून दोन पायलटांचा मृत्यू झाला. लढाऊ विमानामधील दोन्ही वैमानिक प्रशिक्षणार्थी होते. वैमानिकांचे नाव नेगी आणि अबरोल असे होते.
 
 
 
 
 
 
 
हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून मिराज २००० हे विमान, एचएएलद्वारे अद्ययावत असतानाही अपघात झाल्याने चौकशी करणार असल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले आहे . विमानाला आग लागल्यानंतर दोन्ही वैमानिकांनी पॅरॅशूटच्या साह्याने उडी मारली होती. मात्र, एक पायलट विमानाच्या अवशेषांवर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आणि दुसऱ्या पायलटचे उपचारदरम्यान मृत्यू झाले.