‘पाँडीचेरी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच एका नव्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘पाँडीचेरी’ असे आहे.  नुकतेच या चित्रपटाचे चित्रकरण सुरु झाले असून चित्रपटातील सईचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.  प्रदर्शित झालेला पोस्टर ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ स्वरुपात आहे. या फोटोमध्ये सईसोबत अभिनेता वैभव तत्ववादीदेखील झळकला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
‘हा पहिला असा चित्रपट आहे जो आयफोनवर चित्रीत करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये मी विना मेकअप आणि विना हेयरस्टाईल दिसणार आहे.  विशेष म्हणजे या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पाँडीचेरीत चित्रीत होणार आहे’, या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना पहिल्यांदाच एखाद्या कार्यशाळेत जात असल्याचा अनुभव येत होता. त्यामुळे या चित्रपटाची संपूर्ण प्रोसेस मी खूप एन्जॉय केली. प्रत्येक अभिनेत्रीच्या वाट्याला असा एकतरी चित्रपट यायलाच हवा. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाऊन काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता तो अनुभव खूप निराळा आणि मस्त असतो’. असं सई म्हणाली 
 
दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून सचिन कुंडलकर आणि सई ताम्हणकर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘वजनदार’ चित्रपटामध्ये सई ताम्हणकरने काम केले होते.