काश्मिरात जैशच्या दोन अतिरेक्यांचा खातमा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
 
 
 
 

 
 
 
 
श्रीनगर, 
 
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज शुक‘वारी जैश-ए-मोहम्मदच्या दोन अतिरेक्यांचा भीषण चकमकीत खातमा केला. त्यांच्याजवळून शस्त्र व स्फोटकांचा मोठा साठा ताब्यात घेण्यात आला आहे.
पुलवामातील एका भागात असलेल्या पडक्या घरात काही अतिरेकी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी स्थानिक पोलिसांसह व्यापक मोहीम उघडली. प्रत्येक घरांची झडती घेतली जात असताना, एका घरातून अतिरेक्यांनी गोळीबार केला. जवानांनीही त्यास प्रत्युत्तर दिले. यावेळी झडलेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले, अशी माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली.
 
 
 
 
 
 

 
 
 
  
 
शाहिद मुश्ताक बाबा आणि इनायत अब्दुल्ला झिगार अशी या अतिरेक्यांची नावे असून, त्यांच्याजवळील कागदपत्रांवरून ते जैशचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले, असे अधिकार्‍याने सांगितले. शाहिद मुश्ताक हा काश्मीर खोर्‍यातील अनेक दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता आणि सुरक्षा यंत्रणांची त्यांच्या हालचालींवर बारीक नजरही होती, तर इनायत हा अलीकडेच जैशमध्ये सहभागी झाला होता. याआधी तो जैशचा सकि‘य समर्थक म्हणून काम करीत होता. या दोन्ही अतिरेक्यांजवळून एके रायफल्स, जिवंत काडतुसे आणि स्फोटकांचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.