तृणमूल आमदाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
कोलकाता, 
 
 
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिश्वास यांची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच हन्सखली पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांना निलंबित करण्यात आले आहे. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. सत्यजित बिश्वास हे कृष्णगंज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. नाडिया जिल्ह्यात ही घटना घडली. सरस्वती मातेची पूजा सुरू असताना त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
 
 
सत्यजित बिश्वास यांची हत्या भाजपाच्या सांगण्यावरूनच केल्याचा गंभीर आरोप तृणमूल कॉंग‘ेसने केला आहे. सत्यजित यांना गंभीर जखमी अवस्थेत शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सत्यजित यांच्या हत्येमागे भाजपाच्या मुकुल रॉय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे. तृणमूलमधील काही विश्वासघातकी लोकांनी भाजपाच्या या कामासाठी मदत केल्याचा आरोपही तृणमूल कॉंग‘ेसने ट्विटरवरून केला आहे.