दोन वर्षांत 3.79 लाख लोकांना रोजगार;अंतरिम अर्थसंकल्पातील माहिती
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली, 
 
 
मोदी सरकारच्या काळात असं‘य तरुण बेरोजगार झाले, असा दावा कॉंगे‘स आणि अन्य विरोधी पक्ष करीत असतानाच, संसदेत अलीकडेच सादर झालेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारीनुसार, 2017 आणि 2018 या दोन वर्षात सुमारे 3.79 लाख युवकांना सरकारच्या विविध विभागांमध्ये रोजगार मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.
 
2017 पासून डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 2 लाख 51 हजार 279 युवकांना केंद्रीय कार्यालयांमध्ये रोजगार मिळाला असून, मार्च 2019 पर्यंत हा आकडा 3 लाख 79 हजार 544 च्या घरात जाणार आहे. यामुळे मागील साडेचार वर्षांच्या काळात रोजगार मिळालेल्या एकूण तरुणांची सं‘या 36 लाख 15 हजार 770 इतकी होईल, असे केंद‘ीय मंत्री पीयूष गोयल यांनी 1 फेबु‘वारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात म्हटले आहे.
 
मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली असल्याचा दावा कॉंगे‘सचे अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर विरोधक सातत्याने करीत आहेत; तथापि रोजगारीची ही आकडेवारी या विरोधकांना चपराक देणारीच ठरली आहे.
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, निर्वाह निधी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, आयकर विवरण भरणार्‍यांची सं‘या आणि वाहनांच्या विक‘ीत झालेली वाढ आदींचा हवाला देत, संघटित आणि असंघटित क्षेत्रात रोजगारांची सं‘या वाढ मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा दावा केला होता. यातील बहुतांश भरती रेल्वे मंत्रालय आणि पोलिस विभागांमध्ये करण्यात आली आहे.
 
केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये रोजगार भरती कशा प्रकारे करण्यात आली, याबाबतची विभागनिहाय माहितीच या अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. येत्या 1 मार्चपर्यंत पोलिस विभागांमध्ये आणखी 79,353 लोकांना रोजगार मिळाला असेल, असेही अर्थसंकल्पात नमूद आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर विभागात अनुक‘मे 80,143 व 92,842 लोकांना आणि भारतीय रेल्वेत 98.999 लोकांना रोजगार मिळाला असेल, असेही यात म्हटले आहे.