िंहदू ‘लेबल’धार्‍यांचे नीच कृत्य!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
30 जानेवारीला उत्तरप्रदेशच्या अलीगडहून एक बातमी आली. छोटीशी बातमी वेगाने पेटली आणि राजकीय भट्‌टीची आग भडकली. बातमी एका भगवेवस्त्रधारी महिला नेत्याने गांधीजींच्या प्रतीकात्मक पुतळ्याला गोळ्या झाडल्याची होती.
या कृत्यात सामील मंडळी, गांधीजींना काय आणि किती जाणतात, सांगता येत नाही. या मंडळींना आपल्या संस्कृतीची किती जाण आहे, आपल्या संस्कारांवर ते किती दृढ आहेत, हेही शोधावे लागेल. गांधीजी अथवा कुणाच्याही कार्याचे तसेच जीवनाचे मूल्यांकन, विश्लेषण आणि चर्चेचा मुद्दा होऊ शकतो; परंतु कुणा मृत व्यक्तीचा पुतळा तयार करून त्यावर गोळ्या झाडणे... हे काय आहे? या कृत्याला निश्चितच िंहदू िंकवा भारतीय कृत्य म्हणता येणार नाही. ही आमची संस्कृती नाही. स्वत:ला ‘िंहदू’ म्हणवून घेत असे काम करणारे, निश्चितच आपल्या संस्कृतीचे, अनेक महापुरुषांनी स्थापित आचरणाचे श्रेष्ठ सिद्धान्त विसरले आहेत, असेच म्हणावे लागल.
 
धर्मशास्त्र म्हणते- मरणान्तानि वैराणि। अर्थात्‌, मृत्यूनंतर सर्व प्रकारच्या वैराचा अंत. वैर आणि घृणेला मृत्यूनंतरही मनात खदखदत ठेवणे आणि त्या घृणेला प्रदर्शित करणे, या वृत्तीला या देशात कुणीही योग्य म्हणणार नाही. ज्या देशात शिवाजी महाराजांनी, अफजलखानाला मारल्यानंतर त्याची कबर बनविली, ज्या संस्कृतीत जीवनातील मर्यादेचे श्रेष्ठतम आदर्श प्रभू श्रीरामांनी, त्यांच्या सर्वात मोठ्या शत्रूचे- रावणाचे मृत्यूनंतर अंत्यसंस्कारही केले, त्या देशात एका दिवंगत महापुरुषाचा पुतळा तयार करून त्यावर गोळ्या झाडणे... हे कृत्य अतिशय भर्त्सना करण्याजोगेच आहे.
मनात प्रश्न येतो की, काही लोकांना विशेष वेशभूषा करून, िंहदू ‘लेबल’ लावून असले अिंहदू कृत्य करण्याची गरज का पडावी? परंपरा, मान्यता, या संस्कृतीतील उदाहरणे आणि िंहदू धर्म ज्याची आज्ञा देत नाही, त्याची प्रेरणा या सर्वांहून दुसरीकडे कुठेतरी लपली आहे, असेच म्हणावे लागले. हा एक राजकीय खुटीउपाडपणा आहे का, ज्याच्यावर ‘भगवा’ लेबल चिपकविण्यात आले? माझ्या मते असेच असावे.
 


या कृत्याची वेळ बघता, यामागे राजकीय उपद्रव निर्माण करण्याच्या हेतूला नाकारता येत नाही. महानगरांपासून दूर या लहानशा घटनेनंतर िंहदू महासभा संदर्भहीन झाली. परंतु, ‘राई’ला पर्वतासारखे दाखविण्यासाठी कॉंग्रेस वेगाने पुढे आली. यानंतर ज्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या, जे विरोध-प्रदर्शन झाले, त्याचा वापर भारतीय जनता पार्टी िंकवा संघ परिवाराविरुद्ध आक्रोश उत्पन्न करण्यात आणि तो वाढविण्यासाठी पूर्ण शक्तिनिशी करण्यात आला.
साखळीच्या याच कडीला समजणे आवश्यक आहे. कुण्या अज्ञात िंकवा अल्पज्ञात िंहदू संघटनेच्या कुठल्यातरी प्रक्षोभक, िंनदनीय कृत्याला, या संपूर्ण समाजाच्या, या समाजाच्या सर्वात मोठ्या आणि सकारात्मक संघटनेच्या, या देशाच्या राजकीय नेतृत्वाच्या विरोधात एका क्षणात वापरण्याचा हा एक सफल राजकीय डाव आहे.
कॉंग्रेससाठी हा काही नवा डावपेच नाही. आधीच्या पिढ्यांनीही याला वापरले आहे आणि िंहदू समाजाला लांछित करून, समाजाला विभाजित करून, परस्परांशी भांडवून, एवढेच नव्हे, तर नरसंहारही करून कॉंग्रेस सत्तेवर राहिली आहे. संदर्भावरची थोडी धूळ झाडू... गांधींच्या खुनानंतर काय झाले? महाराष्ट्रात चित्पावन ब्राह्मणांची कॉंग्रेसच्या गुंडांकडून खुलेआम हत्या! इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 सालीदेखील कॉंग्रेसचे नेते/कार्यकर्ते अशाच प्रकारच्या शीख नरसंहारात सामील होते.
 
गांधींच्या खुनानंतरच्या घटनाक्रमाचे राजकीय विश्लेषण आणि तथ्यांचा अभ्यास तर फारच महत्त्वाचा आहे. मनोहर माळगावकर यांच्या ‘द मॅन हू किल्ड गांधी’ या पुस्तकात, एल. बी. भोपटकर यांचे वक्तव्य आहे की, तत्कालीन कायदा मंत्री डॉ. भीमराव आंबेडकर यांनी त्यांना स्वत: सांगितले होते की, पुरावे नसतानाही नेहरू या हत्याकांडात सावरकरांना कसेही करून गोवत आहेत. मर्यादित राजकीय दखलअंदाजी सोडली, तर प्रखर सांस्कृतिक विचारवंत सावरकर िंकवा या देशाची चेतना जागृत करण्यासाठी प्रयत्नरत संघ, हे दोघेही त्या काळात नेहरूंना डोळ्यात खुपत होते. असे नसते तर, न्यायालयाने या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रत्येक आरोपातून निर्दोष मुक्त केल्यानंतरही संघावरील बंदी का सुरू राहिली? निश्चितच नेहरू यांचा प्रयत्न होता की, निर्दोष लोकांवरही गांधींच्या खुनाचा कलंक कायम राहावा आणि ब्रिटिशांप्रमाणे त्यांचेही ‘फोडा आणि राज्य करा’ राजकारण सुरू राहावे.
कुठल्यातरी भावनिक मुद्याच्या आड समाजाला विभाजित करून फोडणे आणि राष्ट्रीय एकतेच्या भावनेचा खून करणारे हे राजकारण असेच सुरू राहिले की, काही वर्षांपूर्वी न्यायालयात खेचेपर्यंत राहुल गांधी, संघाला गांधींच्या खुनात दोषी ठरविण्याची चलाखी करत होते.
 असो. निवडणुकीच्या राजकीय वातावरणात भगव्या रंगाच्या आड लपून होणार्‍या नीच कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. कारण, एकाचे अज्ञान अथवा कौतुक, सार्‍या समाजासाठी मोठी डोकेदुखी उत्पन्न करू शकते.