आत्मसंवाद आणि आत्मपरीक्षण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
‘‘शिक्षण असं असावं की ते चांगले विचार उत्पन्न करणारा ‘मानव’ आणि ‘चारित्र्यसंपन्न’ व्यक्तिमत्त्व निर्माण करेल!’’ स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य म्हणजे एक प्रकारे शिक्षणप्रणालीचा तात्त्विक अन्वयार्थ सांगणारं ‘महा’वाक्य आहे.
हे ‘शिक्षण’ विद्यार्थ्यांमध्ये ‘प्रवाहित’ करण्याची जबाबदारी आणि एक प्रकारचा समाजाला घडवण्याचा ‘हक्क’ ज्या शिक्षकांना मिळाला आहे, त्यांनी सर्वप्रथम आत्मपरीक्षण करून चांगल्या विचारांचे, चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवण्याची स्वतःची क्षमता ओळखून आवश्यक त्या बाबी अंगीकारायला हव्या.
 
शैक्षणिक संस्थेत कार्यरत असताना ‘अध्यापन’, ‘संशोधन’ व ‘विकास’, ‘प्रशासन’ आणि यासोबतच ‘एक्स्टेंशन आणि ‘कम्युनिटी सर्व्हिसेस’शी संबंधित जबाबदार्‍या पार पाडताना प्रामुख्याने आपल्यातील शिक्षकामध्ये वसलेल्या विद्यार्थ्याची भूमिका नेहमीच वरचढ ठरते. हा ‘शिक्षकवासीय’ विद्यार्थी सतत स्वतःला अपडेट करत राहतो, कालपरत्वे नव्या गोष्टी आत्मसात करतो आणि अध्यापनात ज्ञान, अनुभव आणि प्रयोग याचा नव्याने वापर करतो.
शिक्षक वर्गात शिकवतात, मात्र विद्यार्थी शिकतात का?
या प्रश्नापासूनच आत्मपरीक्षण करण्याची सुरुवात होते आणि ‘टििंचग-लर्निंग’ प्रोसेसमध्ये महत्त्वपूर्ण बाबी अंगीकारण्याची आणि शिक्षणप्रणालीत आवश्यक असे परिवर्तन आणण्याची आवश्यकता जाणवते.
भूतकाळाची पानं चाळताना एका सुवर्णवर्ख चढलेल्या पानावर दृष्टिक्षेप स्थिरावतो. हे पान वारंवार वाचावंसं वाटतं. कारण दहा वर्षांपूर्वी दिल्ली युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत एका महान शास्त्रज्ञाशी, म्हणजे ‘अग्निपंख’कार डॉ. एपीजे अब्दुल कलाम सरांशी अविस्मरणीय ‘थेटभेट’ झाली होती आणि त्यांच्याशी संवाद साधताना त्यांची काही वाक्यं मनात कायमस्वरूपी कोरल्या गेली आहेत.

 
 
एका समृद्ध, आनंदी आणि बलवान राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षकांची फार मोठी भूमिका असते. शिक्षणप्रणाली सर्जनशील आणि रचनात्मक बनवण्याचं, विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानप्रसारासोबतच मानवी मूल्यांचा विकास करण्याचं आणि चांगला क्रियाशील, कृतिशील आणि जागरूक नागरिक बनवण्याचं काम शिक्षकांचं! तंत्रज्ञानाद्वारे प्रगतीचे आणि अत्याधुनिकतेचे मार्ग उपलब्ध होतात. जागतिक सर्व्हेक्षणानुसार भारतात सर्वाधिक प्रमाणावर युवावर्ग आहे. याचाच अर्थ युवाशक्ती प्रचंड आहे. ही शक्ती योग्य प्रकारे वापरली गेली, तर आपल्या देशाचे भविष्य अत्यंत उज्ज्वल राहू शकेल.
या लेखमालेत सुरुवातीच्या काही भागात आपण बघितली काही अत्युच्च प्रकाशमान शिखरं, संशोधनक्षेत्रातील त्यांचा प्रवास, त्यांनी जगाला दिलेलं योगदान! आम्ही अनुभवलेले त्यांच्या प्रगल्भ पावलांचे ठसे, ज्यांना शाश्वतार्थाने विकासाची पावलं म्हणता येऊ शकतात, त्याचा आढावा शब्दबद्ध करण्याचा आणि आपणासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आज अभियांत्रिकी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना ‘क्रिएटिव्हिटी’ आणि ‘इनोव्हेशन्स’च्या मार्गावर चालण्यास उद्युक्त करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र, त्यांच्या मूलभूत ज्ञानाचा पाया मजबूत नसल्याने त्यांची या मार्गावर चालताना पावलं लटपटतात, ही वस्तुस्थिती आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यामागचा तुमचा मूळ उद्देश काय?
तुमच्या स्ट्रेंथ्स, विकनेसेस सांगा...
तुमचे ऍट्रिब्युटस आयडेंटिफाय करा...
ग्रॅज्युएशनची डिग्री घेतल्यानंतर तुम्ही काय करणार? पुढे शिकणार, की इंडस्ट्री जॉईन करणार? हायर एज्युकेशनकडे तुमचा कल असेल, तर मॅनेजमेंटचा कोर्स करणार की इंजिनीयरिंगचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स? भारतात शिकणार की परदेशात? भारतात नोकरी करणार की परदेशात? स्वतंत्र व्यवसाय सुरू करणार असाल तर प्रॉपर बिझिनेस प्लॅिंनग केलं आहे का?
तुमचं नॉलेज सस्टेनेबल आहे, असं तुम्हाला वाटतं का? कोणकोणत्या स्किल्स तुम्ही डेव्हलप केल्या आहेत? प्रोफेशनल जगात प्रवेशण्याआधी तुमच्या प्रोफेशनल स्किल्स पुरेशा डेव्हलप झाल्या आहेत का? प्रोफेशनल एथिक्स तुम्ही पाळता का?
तुम्ही मॉडर्न टूल्स हाताळू शकता का? पुढील दहा वर्षांमध्ये तुम्ही स्वतःला कोणत्या पोझिशनवर बघू इच्छिता? वीस वर्षांनंतर कुठली पोझिशन ऍक्वायर करण्याचे तुमचे स्वप्न आहे?
तुम्हाला तुमची स्वप्नं बघण्याचा निश्चितच अधिकार आहे. आईवडिलांची आणि तुमची स्वप्नं परस्परविरोधी असल्यास तुमची वाटचाल कोणत्या दिशेने राहील?
तुमच्या रोल मॉडेलविषयी दोन वाक्य बोला...
तुम्ही डायरी लिहिता का?
 
असे बरेच प्रश्न प्रत्येक शिक्षक आपल्या वर्गात विद्यार्थ्यांना विचारतात. विद्यार्थ्यांनी थोडं अंतर्मुख होऊन स्वतःला तपासून घ्यावं, हा एकमेव उद्देश ! सामान्यतः दहा ते पंधरा टक्के विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं देण्यास उत्सुक असतात. बुजरी मुलं आपली मतं मांडत नाही. पण, बाकी विद्यार्थ्यांचं काय? ते स्वतःच्या आयुष्याला ‘कॅज्युअली’ जगतात? स्वप्न, उद्दिष्ट, महत्त्वाकांक्षा हे केवळ शब्दांचे बुडबुडे नसून आपल्या आयुष्याला प्रयोजन प्राप्त करून देतात, आपल्याला क्रियाशील बनवतात, याची सर्वांना जाणीव असायला हवी. आपली पर्सनल डायरी आपल्या स्वप्नांना, नियोजित कामांना, यशदायी क्षणांना, इतकंच नव्हे, तर अपराधांनाही पोटात घेऊन शांत जागी पहुडलेली असते. डायरी असं एक स्थान आहे, जिथे मॅन्युपलेशन्स होऊ नये असं अपेक्षित असतं! देवाच्या मूर्तीसमोर बसून डोळे मिटून जेव्हा आपण संवाद साधत असतो, तेव्हा तो खर्‍या अर्थाने आपल्या आत्म्याशी साधलेला संवाद असतो. तसाच आपलं लेखनमार्गाने डायरीद्वारे साधत असतो. डायरी लिहिणे म्हणजे आपल्या अंतर्मनावर झालेल्या संस्काराची पडताळणी, आपलं मिशन व्हिजन, ऑब्जेक्टिव्हज, स्वप्नपूर्तीकडे आपली वाटचाल, स्वॉट अनालिसिस, चांगल्या वाईट अनुभवांच्या नोंदी आणि आपल्या मनाच्या प्रतिक्रिया इत्यादी! म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपली डायरी लिहावी, असा आमचा आग्रह असतो. रोल मॉडेल कोण, असं विचारल्यानंतर ठरावीक अशा प्रसिद्ध व्यक्तींचा िंकवा स्वतःच्या आईवडिलांचा उल्लेख विद्यार्थी करतात. मात्र, त्यांच्या कोणत्या क्वालिटीज तुम्ही अंगीकारू इच्छित आहात? ते तुमचे ‘रोल मॉडेल’ का आहेत, या प्रश्नाचे उत्तर देण्यास काही विद्यार्थी असमर्थ असतात.
आम्ही शिक्षकांनी स्वत:लादेखील काही प्रश्न विचारायला हवे.
 
तुम्ही उत्तम ‘टीचर’ आहात का? तुमचा दैनंदिन ‘स्टुडन्ट-टीचर’ संवाद हा प्रभावी आणि फलदायी असतो का?
तुमच्या वर्गात सर्व विद्यार्थी समान बौद्धिक पातळीचे नसतात. त्या सर्वांना तुम्ही शिकवलेलं समजावं, यासाठी तुम्ही प्रयत्नशील असता का? कसे? ‘गार्डनर्स प्रिन्सिपल ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स’चा अध्यापनात वापर करता का?
प्रत्येक लेक्चरच्या आधी तुम्ही टीिंचग प्लॅन बनवता का?
तुमच्या शिकवण्यातून ‘ब्लूम्स टॅक्सॉनॉमी’च्या नॉलेज, कॉम्प्रेहेन्शन, अप्लिकेशन, अनालिसिस, िंसथेसिस आणि इव्हॅल्युएशन या लेव्हल्स कव्हर होतात का?
तुम्ही प्राप्त केलेले ज्ञान विद्यार्थ्यांना आजच्या किंटग इज टेक्नॉलॉजीतील आव्हानं पेलण्यास सिद्ध बनवू शकतं का?
तुम्ही तुमचं ज्ञान अपडेट करता का?
तुम्ही शिकवलेले विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणावर आकलन व्हावे यासाठी तुम्ही ‘हाय इम्पॅक्ट टीिंचग स्किल्स’ आणि ‘इनोव्हेटिव्ह टीिंचग मेथडॉलॉजी अॅडॉप्ट करता का?’
विद्यार्थ्यांमध्ये ‘क्रिएटिव्हिटी’ आणि ‘इनोव्हेशन्स’ची बीजं तुम्ही पेरू शकता का?
तुमची ‘रिसर्च’ आणि ‘डेव्हलपमेंट’ ही दालनं पुरेशी समृद्ध आहेत का?
शिकवण्याव्यतिरिक्त अनेक भूमिका पार पाडणं क्रमप्राप्त असतं. तुम्ही अभ्यासक, संशोधक, प्रशासक आणि समाजोपयोगी कार्यात सक्रिय असायला हवं. हे सर्व तुम्ही कसं बॅलेन्स करता?
अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी केवळ ‘इंजिनीयरिंग ग्रॅज्युएट्स’ बनत आहेत. ‘इंजिनियर्स’ किती प्रमाणावर आपण घडवत आहोत? आज फर्स्टक्लास बीईची डिग्री हातात घेऊन काही विद्यार्थ्यांना नोकरीच्या शोधात का भटकावं लागत आहे? प्रत्येक शिक्षकाने अंतर्मुख होऊन विचार केल्यास त्यांना ‘शिक्षक’ या नात्याने आपण खूप काही करू शकतो, याचा शोध लागेल. केवळ ठरावीक अभ्यासक्रम शिकवून मोकळं व्हायचं की, अधिक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या स्किलसेट्स डेव्हलप करून अधिकाधिक प्रमाणावर ‘एम्प्लॉएबल’ बनवायचं? केवळ इतकंच नव्हे, तर आपल्या विद्यार्थ्यांना जगाच्या पाठीवर कुठेही स्वतःला एक अभियंता म्हणून सिद्ध करता आलं पाहिजे, असे एफर्टस्‌ आपण घेत आहोत का?
 
अशा प्रकारचा आत्मसंवाद शिक्षक आणि विद्यार्थ्याने सुरू ठेवल्यास सतत आत्मपरीक्षण होत राहील. या परीक्षणात तटस्थ भूमिकेतून स्वतः:चे मूल्यांकन करत राहावे. त्यानंतर अधिकाधिक गुण प्राप्त करत राहू, तेव्हा आपण सर्वांगीण विकासाकडे शाश्वतार्थाने वाटचाल करत आहोत, असं समजायला हरकत नाही. दिवसभराच्या बहुतांश ‘अॅक्टिव्ह’ कालावधीत शिक्षक-विद्यार्थी सोबत असतात. या दरम्यान त्यांच्यात अधिकाधिक ‘फ्रुटफुल इंटरॅक्शन’ व्हायला हवं. मूलतः शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी घडवायला हवं. त्यांच्या आयुष्याला, करीयरला योग्य दिशा मिळेल असा प्रयत्न करावा. मात्र, त्याआधी शिक्षकांनी आपल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या आणि संशोधनाच्या कक्षा विस्तारायला हव्या.
विकासाची शाश्वतार्थानं पावलं टाकणं क्रमप्राप्त आहे.
 
आपली ‘टीिंचग फिलॉसॉफी’, ‘टीिंचग इफेक्टिव्हनेस’चे इव्हॅल्युएशन करण्यासाठी वापरलेली पद्धत, याचे प्रत्येक शिक्षकाला ज्ञान असले, तर खर्‍या अर्थाने ‘आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टीम’ अवलंबण्यास आपण बाध्य होऊ आणि भारताचे ‘वॉिंशग्टन अकार्ड’चे सििंग्नटरी मेंबर बनणे अर्थपूर्ण ठरेल.
 
शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांना विकासाची पावलं टाकण्यास कसं उद्युक्त करता येईल? आम्ही शिक्षकांनी काही आवश्यक बाबींसाठी आपण सक्षम आहोत का, याचं आत्मपरीक्षण करता येऊ शकेल का, या उद्दिष्टाने टाकलेले लेखमालेतील हे पुढचे पाऊल!
शुभांगी रथकंठीवार
..............................