राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019

मेष : तुमच्या आकांक्षांना पंख फुटतील. मनात येईल ते साकार होईल. महादेवाला बेल वहा.
वृषभ : दुचाकी वाहनांपासून सावध रहा. अपघाताची शक्यता आहे. सकाळी इष्ट देवतेचे स्मरण करा.
मिथुन : जुनी येणी वसुल होण्याचा आजचा दिवस आहे. उधार देऊ नका. हिरवे उडीद गायीला खावू घाला.
कर्क : कलाक्षेत्रांत वावरणार्‍या मंडळींना आजचा दिवस लाभदायक आहे. अपेक्षित फळ मिळेल. चंद्र कोरीची पूजा करा.
िंसह : परीक्षेच्या तयारीला लागा. प्रारंभासाठी आजचा दिवस शुभ. गणपती स्तोत्र पठण करा.
कन्या : तुम्ही आधी करून ठेवलेल्या कामाचे फळ आज नक्की मिळेल. मारोतीची उपासना करा.
तूळ : आज कुठेही जाऊ नका. तुम्हाला अपेक्षित असलेली व्यक्ती घरी येईल. गावातल्या मंदिरात दर्शनाला जा.
वृश्चिक : दात कोरून पोट भरता येत नाही, हे आज लक्षांत येईल. खर्च करावाच लागेल. देवीचा मळवट भरा.
धनू : कुणाशीही भांडू नका. गैरसमज टाळा. पिवळा रंग आज लाभदायी आहे.
मकर : इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करा. दुखावू नका. पूृर्व दिशेला असलेल्या मंदिरांत पूजा करा.
कुंभ : तुमच्या कामात इतरांचा हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना त्याचवेळी उत्तर द्या. बेलवृक्षाखाली बसून िंचतन करा.
मीन : अचानक कुणीतरी येईल आणि तुम्हाला अडचणीतून सोडवेल. गायीच्या तुपाचा दिवा देवाजवळ लावा.