अबुधाबीतील न्यायालयात हिंदीचा समावेश
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
दुबई, 
 
  
अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी अधिकृती भाषा म्हणून हिंदीचा औपचारिक समावेश केला आहे. या निर्णयामुळे अरेबिक आणि इंग्रजीनंतर आता तेथील न्यायालयांमध्ये हिंदीचाही वापर करता येणार आहे.
 
 
न्यायालयीन खटल्यांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना झटपट न्याय मिळावा, या उद्देशाने हिंदीला न्यायालयातील तिसरी अधिकृत भाषा म्हणून स्थान देण्यात आले असल्याचे अबुधाबीच्या विधि विभागाने शनिवारी जाहीर केले. यापुढे या देशातील न्यायालयांमध्ये खटले दाखल करणार्‍या आणि न्याय मागणार्‍या नागरिकांना हिंदीतूनही आपल्या याचिका सादर करता येणार आहेत, असे या विभागाने म्हटले आहे.
 
 
हिंदी भाषिक लोकांना त्यांची याचिका कोणत्या टप्प्यात आहे, तसेच त्यांचे हक्क आणि कर्तव्य याची माहिती भाषेच्या अडथळ्यांविना प्राप्त होणार आहे. दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार अबुधाबीची लोकसंख्या सुमारे ९० लाख असून, यात दोन तृतियांश नागरिक विदेशातून स्थलांतरित होऊन आले आहेत. संयुक्त अरब अमिरातमध्ये भारतीय नागरिकांची संख्या २६ लाख इतकी ओहे. ही आकडेवारी एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के आहे.