अफगाणमधील हवाई हल्ल्यात 21 ठार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
काबुल, 
 
 
 
नाटोच्या फौजा आणि तालिबान्यांमध्ये घनघोर लढाई सुरू असलेल्या अफगाणिस्ताच्या दक्षिणेकडील हेलमंड जिल्ह्यात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात 21 जण ठार झाले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
 
पहिल्या हवाई हल्ल्यात 13 आणि दुसर्‍या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला, असे सूत्रांनी सांगितले. हे दोन्ही हवाई हल्ले शुक‘वारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आले होते.