गोव्यात सौर ऊर्जा धोरण लागू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
समुद्रकिनाऱ्यावरील राज्यांत अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारने गुरुवारी सौर ऊर्जा धोरण लागू केले आहे. राज्य सरकारकडून सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांना आणि ग्राहकांना ५० टक्के सबसिडी मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
 
 
 
 
ऊर्जा निर्मात्याने ठरवून दिलेल्या कालावधीच्या आत वीजनिर्मिती केली नाही, तर दर दिवशी जेवढी वीज देणे बंधनकारक आहे, त्याच्या किमतीच्या पाच टक्के दंडही या धोरणात आकारण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सौर ऊर्जा परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध झाली असून यामुळे राज्याचा पारंपरिक ऊर्जा खरेदीवरील खर्च कमी होण्यास मदत होईल. या धोरणातील ५० टक्के सबसिडीत भांडवली किंमतीसाठी केंद्राचा वाटा ३० टक्के आहे. ही भांडवली किंमत नवीन आणि नूतनीकरण ऊर्जा मंत्रालयातर्फे पुरविण्यात आलेल्या निधीतून किंवा गोवा ऊर्जा विकास एजन्सीद्वारे निघालेल्या निविदा प्रक्रियेद्वारे आलेल्या निधीतून देण्यात येईल.