अभिनेता महेश आनंद यांचे निधन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
हिंदी चित्रपटसृष्टीत १९८० ते १९९० सालापर्यंत खलनायकाच्या भूमिकेतून रसिकांना भुरळ पाडणारे अभिनेता महेश आनंद यांचे यारी रोड येथील राहत्या घरी निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार त्यांचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आले आहे. जवळपास १८ वर्षानंतर त्यांनी गोविंदाचा सिनेमा रंगीला राजामधून सिनेइंडस्ट्रीत पुनरागमन केले होते.
महेश आनंद यांनी शहेनशाह, मजबूर, स्वर्ग, थानेदार, विश्वात्मा, गुमराह, खुद्दार, बेताज बादशाह, विजेता आणि कुरुक्षेत्र या चित्रपटात काम केले होते.