शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर रुग्णाच्या पोटात विसरले कैची
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
हैदराबाद, 10 फेब‘ुवारी
 
 
 
 
 
शस्त्रकि‘येदरम्यान डॉक्टरच्या निष्काळजीपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. हैदराबादच्या निझाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात एका महिला रुग्णावर हर्णियाची शस्त्रकि‘या करण्यात आली. शस्त्रकि‘येदरम्यान वापरलेली कैची डॉक्टरांनी तशीच त्या महिलेच्या पोटात सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
एक नोव्हेंबर रोजी महेश्वरी चौधरी (33) यांच्यावर रुग्णालयात हर्णियाची शस्त्रकि‘या झाली. शस्त्रकि‘येनंतर त्यांना पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला. 12 नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पण 7 फेब‘ुवारीला रात्री पोटात प्रचंड वेदना होत असल्याने त्या पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यावेळी एक्स रे रिपोर्टमध्ये त्यांच्या पोटात कैची असल्याचे दिसून आले.
ही कैची काढण्यासाठी या महिलेवर आता पुन्हा शस्त्रकि‘या करण्यात येणार आहे. या निष्काळजीपणाच्या चौकशीसाठी रुग्णालयाने समिती स्थापन केली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी आरएमओकडे तक‘ार नोंदवली. आपली चूक असल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णालय प्रशासन तो एक्स रे रिपोर्ट देत नव्हते पण आम्ही तो मिळवला, असे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.