देशभरात राबविणार ‘मोबाईल शॉप’ संकल्पना; दुकानदारांना मिळणार परवाना
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
नवी दिल्ली, 
 
 
 
 
राष्ट्रीय नगर उदरनिर्वाह मिशन अंतर्गत देशभरातील रस्त्यांवरील दुकानदारांसाठी ‘मोबाईल शॉप’ ही संकल्पना सादर करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून ही योजना राबविण्यात येणार आहे.
 
 
या मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी या योजनेची माहिती दिली. या योजनेंतर्गत रस्त्यांवर फिरून वस्तूंची विक‘ी करण्याकरिता मोबाईल शॉप मालकाला परवाना दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
मंत्रालयाने अलीकडेच आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत ही संकल्पना सादर करण्यात आली होती. या कार्यशाळेत रस्त्यांवरील दुकानदारांच्या कल्याणाकरिता अनेक उपाय सुचविण्यात आले होते. यात ‘मोबाईल शॉप’ या संकल्पनेचाही समावेश होता. हा प्रस्ताव आम्ही स्वीकारला असून, रस्त्यावरील विक‘ेत्यांना मोबाईल शॉपचे मालक होण्यासाठी निधी कसा उपलब्ध करायचा, यावर आम्ही गंभीरपणे विचार करीत आहोत, असे ते म्हणाले.
 
 
रस्त्यावरील विक‘ेत्यांसाठी 2014 मध्ये तयार केलेल्या कायद्यांतर्गत, देशभरातील 2430 शहरांमधील 18 लाख रस्त्यावरील विक‘ेत्यांची यादी आम्ही तयार केली आहे. हे फिरते दुकानदार समाजाला विविध प्रकारच्या आणि महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करीत असल्याने त्यांना सुरक्षा उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारचे स्पष्ट मत झाले आहे, याकडेही मिश्रा यांनी लक्ष वेधले.