उत्तरप्रदेश- उत्तराखंडमध्ये विषारी दारूचे ११२ बळी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
उत्तराखंडमधील हरिद्वार आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये विषारी दारू प्यायल्याने  आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हे बालूपूर आणि सहारनपूर या ठिकाणचे रहिवासी आहेत.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यातील नांगल आणि नजीकच्या गावांतील रहिवासी गुरुवारी बालूपूर येथून दारू पिऊन परतल्यानंतर आजारी पडले. शुक्रवारी हरिद्वारमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला तर सहारनपूरमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे . शनिवारी दुपारपर्यंत मृतांचा आकडा वाढून ७० वर पोहोचला होता. परंतु, रविवारी हा आकडा ११२ वर पोहोचला आहे.