ह्रितिकच्या ' सुपर ३०' ला प्रदर्शनाचा मुहूर्त सापडला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अभिनेता हृतिक रोशन जवळपास दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘सुपर ३०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाचे प्रदर्शन गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. हा चित्रपट कंगनाच्या ‘मणिकर्णिका’सोबत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र गेल्या महिन्याभरात या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हृतिकच्या चाहत्यांच्या नशीबी प्रतीक्षा करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. अखेर ‘रिलायन्स एंटरटेनमेंट’नं ‘सुपर ३०’ च्या प्रदर्शनाबद्दल खुलासा केला आहे.
चित्रपटाचे काही काम बाकी आहे त्यामुळे प्रदर्शनास दिरंगाई होत असल्याची माहिती रिलायन्स एंटरटेनमेंटकडून देण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता २६ जुलै २०१९ मध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलने केले आहे. तसेच या चित्रपटात अनेक नवीन दृश्यांचा ऐनवेळी समावेश करण्यात आला त्यामुळेही चित्रीकरणास विलंब झाला.
 
 
 
 
 
 
आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे.