महाआघाडीचे सरकार आले तर...रोज बदलतील पंतप्रधान : अमित शाह
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पणजी, 
 
 
उद्या जर देशात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले तर सोमवारी मायावती पंतप्रधान असतील, मंगळवारी अखिलेश, बुधवारी देवेगौडा, गुरुवारी चंद्राबाबू नायडू, शुक‘वारी स्टॅलिन, तर शनिवारी शरद पवार पंतप्रधान असतील आणि रविवारी देशाला सुटी असेल. याचाच अर्थ देशात दररोज पंतप्रधान बदलले जातील, असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांंनी महाआघाडातील घटकपक्षांवर तोफ डागली.
 
 
कॉंग‘ेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा दौर्‍यात अनपेक्षितपणे मु‘यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली आणि त्या भेटीशी राफेलला जोडून तुच्छ राजकारण केले आहे, असा घणाघातही शाह यांनी केला. गोव्यात पणजीजवळ भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाह गोव्यात आले होते.
 
 
55 वर्षे राज्य करूनही देशाला अपेक्षित विकासापर्यंत नेण्यास अपयशी ठरलेल्या कॉंग‘ेसला आमच्या 55 महिन्यांच्या कामाची माहिती मागण्याचा अधिकार नसल्याचेही शाह म्हणाले. आजारी असूनही गोव्याचे मु‘यमंत्री मनोहर पर्रीकर राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन केंद्राकडे सतत पाठपुरावा करीत असतात. त्यांच्यासारखा मु‘यमंत्री आपण आयुष्यात पाहिला नाही, अशा शब्दात शाह यांनी पर्रीकरांचे कौतुक केले.
 
 
भाजपाचा कार्यकर्ता कसा निष्ठेने काम करतो, त्याचे पर्रीकर हे उत्तम उदाहरण आहेत. पर्रीकर आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी भाजपा सरकारने प्रयत्न केल्याचा दावा अमित शाह यांनी सर्जिकल स्ट्राईकचे उदाहरण देत केला.
 
 
शाह यांनी गोव्यात येताच मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर पर्रीकर यांनी आपण कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी तुमच्यासोबत येत असल्याचे सांगत सभास्थळ गाठले. पर्रीकर यांनी बसून भाषण करताना, केंद्रात मोदी यांचे सरकार पुन्हा आणण्यासाठी छोटे-मोठे मतभेद विसरून एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन, त्यांनी कार्यकर्त्यांना केले.