काश्मीर खोऱ्यात पुन्हा शीतलहर; पारा शून्याच्या खाली
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
काश्मीर खोऱ्यात बहुतेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला होता. रस्त्यावर बर्फ जमा झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री पारा ५.७ अशांनी घसरला होता. गुलमर्ग आणि उत्तर काश्मीरमध्ये सर्वाधिक थंडी होती. तिथे पारा वजा १४.२ अशांवर गेला होता. दक्षिण काश्मीरमधील पहेलगाममध्ये पारा वजा १२.७वर गेला होता. काजीगुंड येथे वजा ९ तर कुपवाडामध्ये वजा ७.४ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बर्फ साचल्याने वाहने चालविताना अडथळे येत होते. पण, दहाच्या दरम्यान सूर्यकिरणे पडताच बर्फ वितळू लागल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला.
 
 
 
 काश्मीर आणि जम्मू परिसरात होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे परिसरातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांचे सुमारे पन्नास टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती बदरवाहचे कृषी अधिकारी रोहन कुमार यांनी दिली.  हवामान विभागाने १२ रोजी पुन्हा बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.