प्रदूषणाने चीनमधील आयुर्मान २.९ वर्षांनी घटले; वार्षिक ११ लाख मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
चीनमधील प्रदूषणाचा विळखा वाढत चालला आहे.  प्रदूषणामुळे  देशातील सरासरी आयुर्मान घटल्याचे दिसून आले आहे . २०३० पर्यंत प्रदूषणामुळे लोकांचे सरासरी वय २.९ वर्ष कमी होण्याची शक्यता आहे , असा दावा अमेरिकी संशोधकांच्या पाहणीतून करण्यात आले आहे. 
 
चीनने जागतिक बँकेच्या मापदंडानुसार प्रदूषण कमी करण्यात यश मिळवल्यास सरासरी वयोमान ७६.३ टक्क्याहून ७९ वर्षापर्यंत पोहचू शकेल, असे अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट विभागाने म्हंटले आहे. गेल्या पाच वर्षात चीनने प्रदूषण नियंत्रणात काही अंशी का होईना यश मिळवल्याचे निरीक्षणही या संस्थेने नोंदवले आहे. 
 
चीनने सरासरी कर्रबन उत्सर्जनाचा मापदंड ३५ मायक्रोग्रॅम असे निश्चित केले आहे . मात्र चीनमध्ये मापदंडाच्या तीनपट अधिक उत्सर्जन होते.  प्रदूषणाच्या सार्वजनिक आरोग्याला फटका बसला असून त्यातून लठ्ठपणा, तणाव व स्मृतिभ्रंश इत्यादी आजार वाढू लगे आहे. 
 
पुरुषांच्या तुलनेत महिलांना प्रदूषणाचा जास्त फटका 
 
 एमआयटी चायना फ्युचर सिटी लॅबनुसार वायू प्रदूषणाची पातळी वाढल्यास याचा थेट फटका लोकांच्या आनंदी वृत्तीवर पडला आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या जगण्यावर त्याचा सर्वात वाईट परिणाम दिसून येतो.
 
संशोधकांनी चीनमधील अनेक शहरातील हवेतील प्रदूषणास त्यासाठी जवाबदार मानले आहे . पीएम २.५ स्तर व २.१ कोटी ट्विटच्या विश्लेषणातून शहरी लोकांमधील आनंद विरळ होण्यास प्रदुष कारणीभूत असल्याचे आढळून आले. 
 
चायनीज हॉंकॉंग विद्यापीठानुसार देशात दरवर्षी हवेतील प्रदूषणामुळे ११ लाख लोकं मृत्युमुखी पडतात.  त्यातून अर्तव्यवस्थेला वार्षिक २.७ लाख कोटींचा फटकाही बसतो.