भावुक झाली सौंदर्या रजनीकांत; ट्विटरवर शेअर केले फोटो
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत उद्या ११ फेब्रुवारीला उद्योगपती विशगन वनन्गमुंदीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. हे सौंदर्याचे दुसरे लग्न आहे. या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
‘माझ्या आयुष्यातील तीन सर्वाधिक महत्त्वाचे पुरूष, माझे लाडके बाबा, माझा राजकुमार पुत्र वेद आणि आता माझा विशगन...,’ असे सौंदर्याने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे. सौंदर्या ही दक्षिणेतील एक यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका आहे. सौंदर्याप्रमाणेच तिचा होणारा पती विशगन हा सुद्धा घटस्फोटित आहेत. मॅगझिन एडिटर कनिका कुमारनसोबत त्याचे पहिले लग्न झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाहीत.
 
  
विशगन हा एका औषध कंपनीचा मालक आहे. याशिवाय अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे. वंजगर उलगम या तामिळ चित्रपटात तो सहाय्यक अभिनेता म्हणून दिसला होता. हा त्याचा डेब्यू सिनेमा होता.