हिमाचल प्रदेश; आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सिमला;
 
 
 
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी शनिवारी राज्याचा २०१९-२०२० साठीचा अर्थसंकल्प मांडताना सामान्य प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. आपत्कालीन परिस्थितीत अंतर्गत सुरक्षा देखभाल-दुरुस्ती कायद्यांतर्गत (मिसा) अटक करण्यात आलेल्या लोकांना वार्षिक लोकतंत्र प्रहारी सन्मान योजनेंतर्गत वर्षाला ११,००० रुपये दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
 
सिंचनासाठी लागणाऱ्या वीजेच्या दरात कपात करणार असल्याचेही ठाकूर यांनी या वेळी सांगितले. सिंचनासाठी वीजदर ७५ पैसे प्रती युनिटवरून ५० पैसे प्रती युनिट करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. 'पीकाचे संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के सबसिडी दिली जाईल. तसेच, पर्यटकांना आरक्षित करण्यासाठी सिमल्यामध्ये लवकरच दोन 'लाइट अँड साउंड शो' सुरू करण्यात येणार आहे. राज्यात १५ 'अटल आदर्श स्कूल' सुरू करण्यात येणार आहे,' अशी घोषणादेखील ठाकूर यांनी या वेळी केली