भारतीय इतिहास संशोधक इस्रायलकडून पुरस्कृत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
जेरूसलेम,
सुप्रसिद्ध भारतीय इतिहास संशोधक संजय सुब्रमण्यम्‌ यांना इस्रालयने मानाचा डॅन डेव्हिड पुरस्कार देऊन गौरविले आहे. 10 लाख अमेरिकन डॉलर्स आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आशियाई, युरोपियन तसेच उत्तर आणि दक्षिण अमेरिकन समाजांमधील नवयुगाच्या प्रारंभी झालेले सांस्कृतिक आंतरसंघर्ष हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
 
 

 
 
हा पुरस्कार शास्त्रीय, तंत्रवैज्ञानिक आणि सांस्कृतिक विषयांवरील मौलिक संशोधनासाठी दरवर्षी दिला जातो. या पुरस्काराचे ‘भूतकालीन’ आणि ‘वर्तमानकालीन’ असे दोन विभाग असून भूतकालीन विभागात सुब्रमण्यम्‌ यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.