साराचे नाव घेताच लाजला कार्तिक आर्यन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
 
 
साराला कार्तिक आवडतो ह्यावर शिक्कामोर्तब झाले आणि चर्चेला उधाण आले. सर्वांनाच सारा आणि कार्तिक कधी डेटवर जाणार हा प्रश्न सतावू लागला आहे.
अभिनेत्री सारा अली खान ही काही महिन्यांपूर्वीच जेव्हा वडील सैफ अली खानबरोबर कॉफी विथ करणच्या शोमध्ये आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वीच हजेरी लावली होती. तेव्हा करणने आपल्या नेहमीच्या सवयींप्रमाणे साराला तुला कोणासोबत डेटवर जायला आवडेल असा प्रश्न केला आणि तिने क्षणाचाही विलंब न लावता अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव घेतले. तेव्हापासून साराला कार्तिक आवडतो ह्यावर शिक्कामोर्तब झाले आणि चर्चेला उधाण आले. सर्वांनाच सारा आणि कार्तिक कधी डेटवर जाणार हा प्रश्न सतावू लागला.
 
कार्तिक आर्यन आणि कृती सेनन ही लुपाछुपी जोडी नुकतीचे करणच्या या ६ व्या सीझनमध्ये खास उपस्थित होती. तेव्हा अनेक उलट-सुलट प्रश्न विचारल्यानंतर करण मुद्द्याच्या प्रश्नावर आला. तो कार्तिकला म्हणाला सारामध्ये तु खरंच इंटरेस्टेड आहेस का, तेव्हा कृती पण लगेच म्हणाली साराला तु तुझा पत्ता पाठवलास का? या प्रश्नांच्या सरबत्तीवर कार्तिकनेसुध्दा त्याच पध्दतीत उत्तर दिले.
कार्तिक म्हणाला, ”साराला डेटवर घेऊन जाण्यासाठी सध्या मी पैसे जमवतोय. तसेच शोमध्ये साराचे पिता सैफ अली खानसुध्दा म्हणाले होते जर तुझ्याकडे पैसे असतील तर तु खुशाला साराला डेटवर घेऊन जाऊ शकतोस. म्हणून मी आत्ता पैसे कमवतोय.”
मध्यंतरी एका पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंहनेसुध्दा सारा आणि कार्तिकचे सूत जुळवण्याचा प्रयत्न केला होता. पण सारा-कार्तिकच्या चर्चेदरम्यानच कार्तिक चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेसोबत फिरताना अनेकदा स्पॉट झाला आहे. फक्त चांगले मित्र आहोत असे सांगत कार्तिकने अनन्यासोबतच्या डेटींगच्या बातम्या उडवून लावल्या.