वेडसर मुलाने केली जन्मदात्रीची हत्या
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
मूल,
वेडसर मुलाने दगडाने ठेचून जन्मदात्रीची निर्घुण हत्या केल्याची घटना येथील वॉर्ड क्रमांक 14 परिसरात रविवार, 10 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. कमला बाबुराव दुर्योधन मृतक महिलेचे, तर धिरज बाबुराव दुर्योधन असे आरोपी मुलाचे नाव आहे.
 
 
 
 
 
कमला दुर्योधन ही महिला आपल्या वेडसर मुलासह शहरातील वॉर्ड क्रमांक 14 येथील शासकिय आदिवासी मुलाच्या वस्तीगृहामागील एका छोट्याशा झोडपडीत राहत होते. कमला दुर्योधन या भिक मागून आपली व मुलाची भुक शमवित होती. रविवारी रात्रीच्या सुमारास भिक मागून आणून मला जेवण दिले नाही. या कारणाने संतप्त झालेल्या धिरजने आईच्या डोक्यावर दगडाचे घाव घालून तिची निर्घुण हत्या केली. घटनेची माहिती कळताचा मूल पोलिसांनी तपास करून तिन तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले. तीन तासाच्या आत मूल पोलीसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी धिरज वेडसर असल्याची माहिती आहे. आरोपी धिरज हा शहरात दिवसभर फिरून आल्यावर रात्रो नेहमीच आई कमलाबाईला शिवीगाळ, मारहाण करायचा. या प्रकरणी पोलिसांनी धिरज दुर्योधन याच्याविरूध्द भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मूल पोलिस करीत आहे.