मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या महिलेला ट्रकने चिरडले ; महिलेचा जागीच मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :11-Feb-2019
हिंगणघाट,
 
 
 
 
 
आज सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या महिलेला ट्रकने चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना हिंगणघाट शहरालगत रिमडोह जवळ राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सहा वाजता घडली . यात सकाळी मॉर्निंग वॉक शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला ट्रक ने चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला . हा अपघात इतका गंभीर होत ता की , या अपघातात या मृतक महिलेचा एक पाय शरीरापासून वेगळे होऊन १५ फुटापर्यंत जाऊन पडलेला होता ,तर दुसरा पाय हा शरीरासोबत जमा झाला होता. लक्ष्मी बालाजी सातपुते वय ५२ हे मृतक महिलेचे नाव असून त्या हिंगणघाट येथील संत तुकडोजी वॉर्ड गुरुदेवांच्या मागे राहत होत्या. नित्याने सकाळी शतपावलीला जाणाऱ्या लक्ष्मी सातपुते या आजही शतपावलीला गेल्या असता एका अज्ञात वाहना ने त्यांना जबर धडक दिली या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला याबाबत अन्य शतपावली करणाऱ्या नागरिकांनी हिंगणघाट पोलीस स्टेशनला फोन करून या अपघाताची माहिती दिली अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस स्टेशनचे कर्मचारी मंगेश कांबळे, संजय राऊत व नितीन राजपूत हे घटनास्थळी पोहचले व त्यांनी मृतक लक्ष्मी च्या पार्थिवाला गोळा करून उपजिल्हा रुग्णालयात आणले . पोलिसांच्या नुसार अधण्यात वाहन हा ट्रक असावा ,कारण तशे रबर मार्क घटना स्थळी उमटलेले आहेत . मृतक लक्ष्मी सातपुते यांना दोन मुली व एक मुलगा आहे . या घटनेने शहरात दुखवटा पसरला असून घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती .