राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
 
मेष : रस्ता ओलांडताना सावध रहा. अपघाताची शक्यता आहे. सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात नामस्मराने करा.
 
वृषभ : स्थावराची कामे आज करू नका. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. इष्ट देवतेची पूजा करा.
 
मिथुन : खूप दिवसांची रेंगाळलेली कामे आज कराल. घरच्यांना दुखावू नका. श्वानाला दूध पाजा.
 
कर्क : दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. पैशांची काळजी मिटेल. पोथी वाचायला सुरुवात करा.
 
सिंह : बोलण्याने कुणाला दुखावू नका. वागणूक चांगली ठेवा. रात्री झोपताना स्तोत्र म्हणा.
 
कन्या : आरोग्याचा त्रास जाणवेल. काळजीचे कारण नाही. जेवताना मौन पाळा.
 
तूळ : कुणाच्या कामाला नकार दिला असेल तरीही ते काम करावेच लागेल. मुंग्यांना साखर टाकायला सुरुवात करा.
 
वृश्चिक : आपले ते आपलेच असते, परक्याचे धन कधीच आपले नसते, याचा प्रत्यय यावा. देवीची ओटी भरा.
 
धनू : चांगल्या पद्धतीने एखादा विषय समजून घेण्याची आज खरोखरीच गरज आहे. कुलदेवतेचे स्मरण करून दान द्या.
 
मकर : नाटक- सिनेमाला जाल. कलावंतांच्या भेटी होतील. शंकराची आराधना करा.
 
कुंभ : जुनी येणी वसुल होतील. कामात लक्ष घालाल. शुभ्र रंग आज फायद्याचा आहे.
 
मीन : कुणाचा राग आला असेल तर तो आज आवरा. अपेक्षित घटना घडतील. महादेवाला दुधाचा अभिषेक करा.