बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार ७ जखमी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जळगाव
 
 
 
 
मंगळवारी पहाटे दोन वाजता जळगावनजीक नशिराबाद येथील कपूर पेट्रोल पंपासमोर खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली.  अपघातात चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला असून इतर सात जण जखमी झाले आहे. अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजुकडील वाहतूक चार तास खोळंबली होती. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
 
महेंद्रा ट्रॅव्हल्सची बस यवतमाळहून सुरतकडे तर ट्रक हा भावनगर (गुजरात) मधून अमरावतीकडे जात होता. मृतांमध्ये ट्रकचालक राजाराम गेनाराम चौधरी ( २६, रा. बावडी ता.चौटल जि.बारमेर, राजस्थान), निर्भयसिंग प्रतापसिंग कंवर (३९, रा पलासिया ता.जाडोन, जि.उदयपूर, राजस्थान) व आराम बसचा चालक शंकर पटेल (रा. राजस्थान) यांचा समावेश आहे. या अपघातात विनोद राठोड (रा.भांबोरा ता.घाटंजी, यवतमाळ), राधा विनोद राठोड (३०), पूजा विनोद राठोड, नारायण विनायक तांबोळे (४५), गजानन चावके (रा.दिग्रस, यवतमाळ), संतोष अग्निहोत्री, (दोघे रा.दिग्रस, यवतमाळ), ट्रॅव्हल्समधील वाहक अतिष पवार (३८) रा.खामगाव, जि.बुलडाणा) हे जखमी आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.