मोबाईलचा स्फोट; ८ वर्षीय मुलाने गमावली चार बोटं
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मोबाइलचा स्फोट झाल्याने एका ८ वर्षीय मुलाला त्याची चार बोटं गमवावी लागली आहेत. नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुखेड तालुक्यातील जिरगा गावात ही घटना घडली. श्रीपत जाधव या शेतकऱ्याचा हा मोबाइल असून टीव्हीवर या मोबाइलची जाहिरात पाहिल्यावर त्यांनी हा मोबाइल ऑर्डर करून मागवला होता.
I Kall K-72 या कंपनीचा हा मोबाइल शेतकऱ्याने १५०० रुपयांमध्ये घेतला होता.  तसेच या मोबाइलवर एक घड्याळही फ्री मिळाले होते . या शेतकऱ्याने एकूण तीन फोन विकत घेतले होते. त्यातलाच हा एक फोन होता. श्रीपत जाधव यांचा आठ वर्षांचा मुलगा या मोबाइलवर गेम खेळत होता. तेवढ्यात या मोबाइलचा स्फोट झाला. या घटनेत प्रशांतला त्याची चार बोटं गमवावी लागली. प्रशांतच्या हातात मोबाइलचा स्फोट झाला त्यानंतर प्रशांतला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र त्याची बोटं वाचू शकली नाहीत.